शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचा राजीनामा निरर्थक!

By admin | Updated: July 22, 2014 09:59 IST

उद्योगमंत्री नारायण राणो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे अगदी क्षुल्लक घटना आहे. अशा घटना दररोज घडतात.

मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे अगदी क्षुल्लक घटना आहे. अशा घटना दररोज घडतात. त्यामुळे अशा निर्थक गोष्टींमध्ये वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. त्यावर मी प्रतिक्रिया देण्याचे सोडले आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणोंच्या राजीनाम्याकडे दुर्लक्ष केले.
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनात बोलताना उद्धव म्हणाले, 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणाचा क्षण हा आनंद देणारा असून, राज्याच्या वेशी ओलांडून संमेलन पुढे जात आहे, याचेही कौतुक आहे. साहित्य संमेलन म्हटले, की संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच आहे. यंदाचे साहित्य संमेलन मात्र वादाशिवाय पार पडेल, अशी आशा आहे.
 साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, संमेलनाचे निमंत्रक व मुख्य संयोजक भारत देसडला, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि शिवसेना प्रवक्त्या नीलम गो:हे आदी  याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
..अखेर बोधचिन्ह साकारले!
च्गेले 15-2क् दिवस संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी धडपड सुरू होती. या काळात रात्रंदिवस मेहनत करत असताना जवळपास 
8क् बोधचिन्हे साकारली, त्यानंतरच अखेर बोधचिन्ह साकारल्याचे कलाकार ख्वाजा सय्यद यांनी सांगितले.
 
च्हे बोधचिन्ह साकारण्यासाठी आपण संत नामदेवांच्या साहित्याचा अभ्यास केला. दरम्यान, या काळात ‘गुरू ग्रंथसाहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथाचीही बरीच मदत झाली. त्याचप्रमाणो गतकाळातील साहित्य संमेलनांच्या बोधचिन्हांचाही संदर्भपूर्ण अभ्यास केल्याचे ख्वाजा सय्यद यांनी सांगितले. 
 
नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमान येथे संत नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. तसेच, केवळ स्मारक न उभारता मराठी साहित्य संपदेविषयी सर्व माहिती त्या ठिकाणी असेल. या माध्यमातून नामदेवांच्या स्मृतींचे जतन करण्यात येईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
‘मी आणि माझं घर बरं’ हे सोडा  
मराठी माणूस नेहमीच ‘मी आणि माझं घर बरं’ यामध्ये अडकलेला असतो. यातून त्याने बाहेर पडावे, अस आवाहनही उद्धव यांनी केले.
 
पंढरपूर-घुमान विशेष रेल्वेसेवा
केवळ साहित्य संमेलन घेऊन घुमान आणि महाराष्ट्राचे संबंध दृढ होऊ शकत नाहीत; तर त्यासाठी पंढरपूर-घुमान ही विशेष रेल्वेसेवा सुरू केली पाहिजे. मी स्वत: खासदारांकडून यासंबंधीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
 
राणोंनी राजकीय भूकंप घडविलाच नाही : केसरकर
सावंतवाडी : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी राजकीय भूकंप घडविलाच नाही, असा उपरोधिक टोला आमदार दीपक केसरकर यांनी येथे लगावला.  आपल्या विरोधात बोलणा:यांचे हात मुळापासून उखडून टाका, असे आदेश कार्यकत्र्याना दिले आहेत. त्यांची ही भाषा प्रक्षोभक असून, शासनाने त्यांचे भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केसरकर यांनी केली.