शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रामराजे बिनविरोध!

By admin | Updated: March 21, 2015 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

विधान परिषद सभापती : शिवसेना-काँग्रेसची ऐनवेळी माघार; डावपेचांचे राजकारण हवेत विरलेमुंबई : विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शरद रणपिसे आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल करणारे अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.गेले दोन दिवस सभापतिपदाच्या निवडीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यात डावपेचांचे राजकारण सुरू होते. मात्र अचानक जादूची कांडी फिरल्याप्रमाणे घडामोडी घडल्या आणि अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निंबाळकर यांची निवड जाहीर झाल्यावर सर्व सदस्यांनी सभापतींची एकमताने निवड करण्याच्या उच्च परंपरेचे पालन केल्याबद्दल आपली पाठ थोपटून घेतली.सभापतिपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतर भाजपाने आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देणार  नाही. मात्र शिवसेनेनेही या निवडणुकीत तटस्थ राहावे, अशी भूमिका घेतली. ही भूमिका शिवसेनेला मान्य झाल्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे, पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेच्या उमेदवार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीपूर्वी तशी घोषणा केली. तत्पूर्वी काँग्रेसने डॉ. गोऱ्हे यांना पहिल्या महिला सभापती म्हणून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची डोकेदुखी वाढली होती. यापूर्वी शिवसेनेने काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली होती. मात्र भाजपाशी चर्चा करून शिवसेनेने निवडणुकीत तटस्थ राहण्याची व उमेदवार मागे घेण्याची घोषणा केल्याने काँग्रेसचा नाइलाज झाला व त्यांनीही आपले उमेदवार शरद रणपिसे यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतीपदाकरिता केवळ निंबाळकर यांचा अर्ज उरल्याने भाजपा-शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय ऐनवेळी बदलून ही निवडणूक एकमताने करण्याचा निर्णय घेतला. (विशेष प्रतिनिधी)विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात ठेवला आणि काँग्रेसची मते घेतली तर सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानेच शिवसेनेने नमते घेतले; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला विधान परिषदेतील उपसभापतिपदाचे गाजर दाखवल्याने काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा आहे.