शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आता कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा, राजेश टोपेंकडून मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 21:17 IST

काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसिवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती.

मुंबई - रेमडीसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे केंद्रसरकारने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील रेमडीसिवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. 

काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसिवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. आज केंद्रातील मोदी सरकारने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

लशीचा तुटवडा, राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार"

...तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

चिनी अधिकाऱ्यानंच केली त्यांच्या कोरोना लशीची 'पोल-खोल'; जिनपिंग सरकारनं उचललं असं पाऊल

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या