शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंचं मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 11:39 AM

मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रस्त्यांवर लोकांना चालणं मुश्किल मग बुलेट ट्रेन कशाला? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मुंबई- शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. पण, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे.आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही, असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली आहे. इतकं खोटं बोलणार सरकार आणि पंतप्रधान कधी पाहिला नाही, अस म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कामाचं कौतुक करत रेल्वे मंत्री बदलण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही ? बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभुंना हटवलं पियूष गोयल यांना आणलं पियूष गोयल काय आधी टीसी होते, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हंटलं. शुक्रवारी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. 

शुक्रवारी एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी आहे राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. पण  एल्फिन्स्टनवरील घटना घडणार नव्हती असं नाही, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  मुंबईत घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे 5 ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर  मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये राज ठाकरे स्वतः सहभाग घेणार असून मुंबईकरांनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.  या मोर्चातून सरकारला त्यांच्या कामाबद्दल जाब विचारणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

सरकार कुठलंही असो फरक काहीही पडत नाही. आधीचं सरकार असताना काही फरक पडला नाही,  सरकार बदलल्यानंतर काहीही फरक पडला नाही फक्त नोटेचा रंग बदलला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.  

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला रेल्वेची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का? साडेतीन वर्षापासून ते गप्प आहेत, सत्ता आल्यावर आधी पाठपुरावा करणारे आता झोपले, असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे. विरोधी पक्षात असताना किरीट सोमय्या ईव्हीएम मशिनच्या मुद्द्यावर सडकून टिका करत होते, आता ते गप्प का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

परप्रांतियांमुळे पायाभूत सुविधांना बोजवारामुंबईमध्ये परप्रांतियांचे लोंढे येणं काही थांबत नाही. दररोज हजारो लोक मुंबईत येतात. त्यामुळे आधीच कोसळलेल्या पायाभूत सोयीसुविधा अपूऱ्या पडत असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

मुंबईत माणसं मारायला दहशवादी कशाला हवेत?मुंबईमध्ये दररोज काहीना काही घडल्याचं ऐकायला मिळतं. अनेक लोक मारली जातात. मुंबईतील माणसं मारायला आपली रेल्वे सेवा पुरेशी आहेत. त्यासाठी पाकिस्तानातीला दहशतवादी किंवा चीनची काय गरज, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे