शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 10:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियाच्या वापरातून मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तोच सोशल मीडिया आता भाजपाला भारी पडू लागला आहे.या पोस्टमध्ये राज यांनी नोटाबंदी, पोलिसांकरवी प्रश्न विचारणाऱ्यांना नोटीसा पाठविण्याचे काम, महागाई आदी मुद्दे मांडले होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. येत्या रविवारपासून मोदी सोशल मीडियाच सोडणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. यावरून दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मोदींवर आणि भाजपावर टीका करणारी पोस्ट चर्चेत आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. कदाचित ते आभासी जगातून कायमचा संन्यास घेण्याच्या विचारात असल्याचे ट्विटवरून दिसत आहे. याचे संकेत त्यांनी दिलेले असले तरीही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडिया सोडू नका, द्वेष सोडा असा खोचक टोला लगावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटवरून सोशल मीडियामध्ये भूकंप आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचे भाकित दोन वर्षांपूर्वीच केले होते. ज्या सोशल मीडियाच्या वापरातून मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तोच सोशल मीडिया आता भाजपाला भारी पडू लागला आहे. ही पोस्ट राज यांनी 26 सप्टेंबर 2017 ला केली होती. आज ती खरी ठरताना दिसत आहे. 

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय. निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. 

या पोस्टमध्ये राज यांनी नोटाबंदी, पोलिसांकरवी प्रश्न विचारणाऱ्यांना नोटीसा पाठविण्याचे काम, महागाई आदी मुद्दे मांडले होते. आज ही पोस्ट व्हाय़रल होऊ लागली आहे. 

राज ठाकरे यांची पोस्ट येथे पहा...

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकMNSमनसेBJPभाजपा