शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 22:18 IST

विधानसभा निवडणूक निकालानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती

मुंबई - २०१९ विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या ५ वर्षात अनेक उलथापालथी राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या. त्यात प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकेकाळचे मित्र कट्टर राजकीय विरोधक बनले. उद्धव ठाकरेंनी तर २०२४ च्या निवडणूक प्रचारात एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं टोकाचं विधान फडणवीसांच्या बाबतीत केले होते मात्र तरीही आज एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जिव्हाळा संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्‍यांना रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. त्यात पहिलाच प्रश्न राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारणात काही पक्क नसते. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ठाकरे-फडणवीस पुन्हा जवळीक वाढल्याचं दिसून आले. त्यानंतर सेनेच्या सामना मुखपत्रात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारा एक अग्रलेख प्रसिद्ध झाला. इतकेच नाही तर अलीकडे आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा फडणवीसांसोबत जुळवून घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यात आजच्या मुलाखतीत फडणवीसांनी केलेले सूचक विधान चर्चेत आले आहे. 

दरम्यान, खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवावा असे सहकारी अजित पवार की एकनाथ शिंदे असाही प्रश्न फडणवीसांना विचारला गेला. तेव्हा माझ्यापुरतं विचाराल तर माझे दोघांशी घनिष्ट संबंध आहेत. एकनाथ शिंदेंसोबत माझी जुनी मैत्री आहे. अजित पवारांजवळ जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे खूप जास्त माझे आणि त्यांची मते जुळतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे