शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:57 IST

'गंगा साफ करण्याची घोषणा करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी, आता नरेंद्र मोदी आले...'

Raj Thackeray Gudhi Padwa Melava : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून त्यांनी महाकुंभ मेळावा आणि देशातील नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. 'बाळा नांदगावकरांनी माझ्यासाटी पाणी आणले होते, मी त्यांना सांगितले, मी पिणार नाही. मग नव्याने वारे शिरलेल्या काहींना वाटले की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आज आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्या नद्यांना आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही.'

गंगेचा प्रश्न राजीव गांधींनी पहिल्यांदा मांडलाराज ठाकरे पुढे म्हणतात, 'गंगा साफ करावी असे पहिल्यांदा बोलणारी व्यक्ती राजीव गांधी होती. ते पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत हेच काम सुरू आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तेही म्हणाले गंगा साफ करणार. आताही ते काम सुरू आहे. माझ्याकडे काही उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले लाखो लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानंतर आजारी पडले. पडणारच ना आजारी. त्या गंगेवरची परिस्थिती काय आहे...प्रश्न गंगेचा आणि कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, प्रश्न पाण्याचा आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी गंगेवर खर्च झालेत.'

गंगा प्रदूषणाचा व्हिडिओ दाखवला'एका महंताला मृत्यूनंतर तसेच गंगेत टाकले. घाटावर प्रेत जाळली जातात. अग्नि दिल्यासारखा करतात आणि प्रेत गंगेत टाकून देतात. हा कोणता धर्म? आपल्या देशातील निसर्गावर धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? आपल्या गोष्टींवर आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी आहे. याच विधीसाठी वेगळी जागा करता येत नाही का? ते सांगतात लोक ऐकत नाही, ऐकत कसे नाहीत? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. या नद्यांचे काही भाग इतके गलिच्छ आहेत, या नद्या आपणच धर्माच्या नावाखाली बरबाद करतो आहोत.' यावेळी राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणाचा एक मिनिटांचा व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत गंगेवर प्रेत जाळताना दिसत आहे. 

धर्माच्या गोष्टी मला सांगू नये'महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. देशभरातील 319 नदीपट्टे आणि महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, पवना, तापी, निरा वैनगंगा, रंगवली, वर्धा कृष्णा, मिठी नदी, पाताळगंगा...या नद्यांमधील पात्र खूप खराब आहे. मुंबईत पाच नद्या होत्या, त्यातल्या चार मेल्या, म्हणजे मारल्या. सांडपाणी आणि झोपडपट्ट्यांमुळे नदी मारली. पाचवीही मिठी नदी मरायला आली.' मुंबईतील नद्यांची परिस्थितीही दाखवली. जे-जे नैसर्गित स्त्रोत आहेत, ते त्यांनी बंद करायचे आणि आम्ही त्यावर बोललो तर धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी मला ह्यांनी सांगूच नये,' असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबई