शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने संसार गेले वाहून

By admin | Updated: August 5, 2016 00:46 IST

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस पुणेकरांसाठी खूशखबर घेऊन आला.

पुणे : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस पुणेकरांसाठी खूशखबर घेऊन आला. धरणांतील पाणीसाठा वाढला. मुठामायही वाहू लागली. मात्र, पुण्यातील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या भटक्या कष्टकरींचे संपूर्ण संसार निसर्गाच्या या तडाख्याने वाहून गेले. त्यांची रोजीरोटी असणारे फुगे आदी साहित्यही पाण्यात गेल्याने खायचे काय? ही परिस्थिती त्यांच्यासमोर असून, सुमारे १५० जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. झेड ब्रिज परिसरात सुमारे ३० कुटुंबे राहतात. शासनाकडून त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड अशा सुविधाही मिळाल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या लेखी त्यांची नोंदच नाही. त्यामुळे मंगळवारी नदीला येणाऱ्या पुराचा इशारा देण्याची यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. कचरा व प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या, धुणी-भांडी करून आपले पोट भरणाऱ्या महिला येथे आहेत. पुरुष फुगे आदी साहित्य विकतात. घराचा आडोसा म्हणजे प्लॅस्टिकचा कागद, गंजलेल्या पत्र्यांचा आडोसा किंवा लाकडी फळ््या. मात्र, तरीही हे घर आहे आणि सगळा संसारच त्यामध्ये आहे. लहू काळे यांनी दोन मुलींसह घरात पाणी शिरल्याने डेक्कनच्या पीएमटी शेडमध्ये आडोश्यासाठी धाव घेतली. कपडे, घरातील भांडी, अन्नधान्य मुलांची वह्या-पुस्तके असं सगळं वाहून गेलं होतं. आता दोन वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं आहे, असे प्रदीप काळे यांनी सांगितले. सुमनबार्इंना तर हे सगळं सांगताना अश्रू आवरत नव्हते. >गेली तेरा वर्षे आम्ही झेड ब्रिजच्या खाली राहतो. आधारकार्ड, रेशनिंगकार्ड, बँक पुस्तकावर आमचा येथे राहण्याचा पत्ता आहे. प्रत्येक निवडणुकांच्या काळात नगरपालिकेकडून आम्हाला राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. आमची कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप केला जात आहे.- अब्बाराव काळे( फुगे व्यावसायिक)दोन वर्षांपूर्वी माझे सिलिंडरच्या स्फोटात दोन्ही डोळे गेले. तसेच पोटाला, हाताला जखमा झाल्या. नदीच्या पाण्यात माझा सर्व संसार वाहून गेला आहे. माझी चार मुले, म्हातारे आई-वडील या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. - छोटू काळे