शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पेडणेजवळ रेल्वेवर दरोडा

By admin | Updated: January 20, 2015 23:49 IST

पाच प्रवाशी जखमी : ४८ हजारांचा मुद्देमाल लुटला; झारापजवळ तिघांना पकडले

कुडाळ : मंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम-वेरावल रेल्वेवर पेडणे-गोव्याच्या दरम्यान आज, मंगळवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यादरम्यान, रेल्वेतील पाचजणांवर चाकूचे वार करून सुमारे ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लुटून पळून जात असताना चार दरोडेखोरांपैकी तिघांना प्रवासी व झाराप ग्रामस्थांच्या मदतीमुळे पकडण्यात यश आले. मात्र, एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा कुडाळ पोलीस शोध घेत आहेत. दरोडेखोरांचे कनेक्शन गोवा-मडगाव येथे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मंगलोर येथून आज पहाटे पाच वाजता सुटणारी ही रेल्वे दुपारी १.१५ वाजता झाराप येथे पोहोचली. झाराप स्थानकावर क्रॉसिंगसाठी ती थांबविण्यात आली होती. यावेळी इंजिनकडून पहिल्या डब्यातून ‘चोर चोर... पकडा पकडा...’ असा आरडाओरडा ऐकू आला. जनरल डब्यातून चार दरोडेखोर प्रवाशांकडील पैसे आणि इतर साहित्य लुटून पळण्याच्या प्रयत्नात होते. काहीजणांनी त्या चौघांपैकी एकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश निकम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळालेल्या तिघांपैकी एका दरोडेखोरास ग्रामस्थांच्या मदतीने नजीकच्या जंगल भागातून जेरबंद केले. दरोडेखोरांनी पेडणे-गोवा स्थानकादरम्यान चाकू आणि चॉपरचा धाक दाखवून जनरल डब्यातील सर्व प्रवाशांकडील सुमारे ३० हजार रुपयांची रोकड, मोबाईल, घड्याळे मिळून सुमारे ४७ हजारांचा मुद्देमाल लुटला. याला विरोध करणाऱ्या चार ते पाच प्रवाशांवर चाकू आणि ब्लेडचे वार करून जखमी केले, अशी तक्रार या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गोस्वामी सोनगिरी (वय २५, रा. जुनागढ-गुजरात) याने कुडाळ पोलिसांत दिली. आपल्याबरोबर असलेल्या फैजल असैन राकुट्टी, अब्दुल अजिमल नालकथ, हजमाकोया नालकथ (सर्व रा. केरळ) यांच्याकडील रोकड आणि मोबाईल काढून घेतल्याची माहितीही त्याने दिली. ही गाडी सावंतवाडी-झाराप येथील स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबणार असल्याची माहिती दरोडेखोरांकडे असल्याने त्यांनी आधीच नियोजन करून हा दरोडा घातल्याची शक्यता आहे. मंगलोर एक्स्प्रेसमध्ये दरोडा घालणाऱ्यांना झाराप येथे प्रवासी व ग्रामस्थांनी पकडल्यानंतर एक आरोपी फरार झाला. त्याच्या शोधार्थ जिल्ह्यातील पोलीस कुडाळ तसेच झाराप सावंतवाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. (प्रतिनिधी)सर्व दरोडेखोर कर्नाटकचेआप्पासाहेब हनुमंत निकम (वय २७, रा. तुंगळ जमखडी, बागलकोट), रविल स. गौडा (रा. रामनगर, बिडदी, जि. बंगलोर), विजय रमेश मिरजकर (रा. नवनगर, बागलकोट), अशी अटक केलेल्या तीन दरोडेखोरांची नावे आहेत. फरार झालेल्या दरोडेखोराचे नाव अशोक, असे असून तो मडगाव रेल्वेस्थानकानजीक राहतो, अशी माहिती मिळाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेले हे चारही दरोडेखोर मडगाव येथेच रेल्वेत चढले असावेत व त्यांचे लोकेशन मडगाव येथेच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरोड्याचा घटनाक्रमपेडण्यापासून धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यास प्रारंभचाकू आणि ब्लेडचा धाककाहीजणांचे गळेही दाबलेदुपारी १.३० वाजता रेल्वे झाराप येथे रेल्वे क्रॉसिंगसाठी थांंबली असताना दरोडेखोरांचा पळण्याचा प्रयत्न. एकाला प्रवाशांनी पकडलेदोघांना नजीकच्या जंगलभागातून ताब्यात घेतले.