शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 08:45 IST

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेससह महाविकास आघाडीचे हे गॅरंटी कार्ड ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आश्वासनांची खैरात करणारे राहुल गांधी यांचे ‘गॅरंटी कार्ड’ हे आधीच्या राजस्थान, छत्तीसगडमधील गॅरंटी कार्डसारखेच फ्लॉप होईल, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्र परिषदेत केली. 

काँग्रेससह महाविकास आघाडीचे हे गॅरंटी कार्ड ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, असेच कार्ड राजस्थान, छत्तीसगडमध्येही राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडले होते, आश्वासनांचा वर्षाव केला होता; पण तरीही लोक भूलथापांना बळी पडले नाहीत. 

तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशात त्यांची सत्ता आल्यानंतर तेथे दिलेल्या गॅरंटी कार्डच्या अंमलबजावणीची काय स्थिती आहे, तेही काँग्रेसने सांगावे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. अजित पवार यांच्या चौकशीच्या फाईलबाबत विचारले असता, ती फाईल गोपनीय नव्हती. कोणीही ती फाईल माहितीच्या अधिकारात मागवू शकते. आता आर. आर. पाटील हयात नाहीत, त्यामुळे या प्रकरणाबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या गॅरंटी कार्डवर त्यांनी टीका केली.   

नवाब मलिक यांचा प्रचार आम्ही करणार नाहीनवाब मलिक यांचा भाजप प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आम्ही घेतली आहे. त्यांच्या मतदारसंघात आम्ही शिंदेसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. जर नवाब मलिक यांचा प्रचारच करणार नसू तर सरकार आल्यानंतर त्यांना कसे सरकारमध्ये घेणार, असे फडणवीस यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी