शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 27, 2014 02:09 IST

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे वाक्य नियमित आपल्या कानी पडते. मात्र पुणे विभागात ९ महिन्यांत एसटीचे तब्बल ११८ अपघात घडले आहेत.

अमोल जायभाये, पिंपरी‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे वाक्य नियमित आपल्या कानी पडते. मात्र पुणे विभागात ९ महिन्यांत एसटीचे तब्बल ११८ अपघात घडले आहेत. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघातात मनुष्यहानीबरोबरच एसटीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले़ हे वाढते अपघात रोखण्यासाठी महामंडळाला तातडीने उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. पुणे विभागात १ जानेवारी ते ९ आॅक्टोबर या कालावधीत ११८ अपघात घडले आहेत. यात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२१ जखमी झाले आहेत. ‘गाव तिथे एसटी’ आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांचा अजूनही अभाव आहे. बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाकीटमारी होते. प्रवाशांच्या सेवेशी एकनिष्ठ असणाऱ्या एसटीला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या उपाययोजना करता आल्या नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही़ एसटीला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असतात. प्रवासी दिन, प्रवासात सवलत अशा योजना आखूनही एसटी तोट्यात चालत आहे. ग्रामीण भागात खिळखिळ्या बस धावत आहेत. रस्त्यातच एसटी बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुटलेल्या-फाटलेल्या सीट, काचा नसलेल्या खिडक्या हे नेहमीचेच आहे. अनेक अपघात हे टायर फुटल्याने किंवा स्टिअरिंग फेल झाल्यानेही घडले आहेत. अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. चालक, वाहकाची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियमित काम करावे लागणे किंवा जास्त वेळ गाडी चालवल्यामुळे, चालकाची झोप होत नसल्यानेही अपघात घडल्याची उदाहरणे आहेत़ चालकांना सुट्या मिळत नासल्याने त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. त्यांची मानसिक अवस्था वाहन चालवण्यासाठी सुयोग्य नसते. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होते का, पुरेसे वेतन आहे का, या सर्व गोष्टी पाहणेही गरजेचे आहे.