शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुसदचा मौलाना एटीएसच्या रडारवर

By admin | Updated: October 20, 2015 01:06 IST

मूलतत्त्ववादी विचारधारेच्या मोहात अब्दुल मल्लीक (२०) याला पाडून त्याला राज्यात पोलिसांवर हल्ल्यासाठी तयार केल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या मौलानाची महाराष्ट्र

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमूलतत्त्ववादी विचारधारेच्या मोहात अब्दुल मल्लीक (२०) याला पाडून त्याला राज्यात पोलिसांवर हल्ल्यासाठी तयार केल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या मौलानाची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) चौकशी करीत आहे. हा मौलाना पुसद येथील असून, त्याने मल्लीकला पोलिसांवर हल्ले करण्यास चिथावणी दिली होती आणि तू जेव्हा ‘कुठेतरी’ गेल्यावर तुझे पालक तू बेपत्ता झाल्याची तक्रार करतील, असेही त्याला सांगितले होते. एटीएसने मल्लीकला आधीच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलमांखाली अटक केली असून, आता त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदवून घेऊन मौलानाविरुद्ध कारवाई करणार आहे. राज्यातून एखाद्या मौलानाविरुद्ध प्रथमच एटीएसची कारवाई होत आहे.अब्दुल मल्लीक याने २५ सप्टेंबर रोजी मशिदीत प्रार्थना केल्यावर बाहेर येऊन राज्यात गोमांस बंदीसाठी पोलीस कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याला भोसकले होते. त्याला अडविणाऱ्या आणखी दोन पोलीस शिपायांनाही त्याने भोसकले. स्थानिक पोलिसांनी मल्लीकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, एटीएसकडूनही त्याची त्याचवेळी चौकशी होत आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीत अब्दुलने आम्हाला त्याला मौलानाकडून (मौलानाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही) नियमितपणे मशिदीमध्ये प्रार्थनेनंतर दार्स दिले गेल्याचे सांगितले. भारतीय मुस्लिमांवर अत्याचार होत असताना ते (मुस्लीम) काहीही करीत नाहीत, असे हा मौलाना त्याला सांगायचा. भारतीय मुस्लिमांवरील अत्याचारांबद्दल पाकिस्तानी मुस्लीम संतप्त असल्याचे मौलाना सांगायचा व भारतीय मुस्लिमांनी एक होऊन ‘काहीतरी’ केले पाहिजे, असेही तो म्हणायचा.तुला मी तुझ्या पालकांना काहीही न सांगता ‘कुठेतरी’ पाठविले तर ते तू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करतील असे काही वेळा मौलानाने मल्लीकला सांगितले होते. या त्याच्या विधानाकडे एटीएसचे लक्ष वेधले गेले आहे. २ आॅक्टोबर रोजी आम्ही चौकशी हाती घेतली आणि त्यानंतर मल्लीकवर यूएपीएचे कलम १५ व १६ अंतर्गत गुन्हे दाखल केले. आता आम्ही त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हेगारी प्रक्रिया संहितेचे कलम १६४ अंतर्गत नोंदवून घेत आहोत. त्यानंतर मौलानाच्या दिशेने सरकता येईल, असे हा अधिकारी म्हणाला. मौलानाचे संबंध कोणत्या दहशतवादी संघटनांशी आहेत का हे तपासायचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.मौलाना प्रथमच लक्ष्य मूलतत्त्ववादी विचारांची चिथावणी मिळालेले तरुण राज्यभर असून, त्यांना शोधून काढायचे आणि त्यांना त्या प्रभावातून बाहेर काढण्याचे फार मोठे काम एटीएससमोर आहे. एटीएसच्या राडारखाली थेट मौलाना येण्याची ही मात्र पहिलीच वेळ आहे.