शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातूनच पुण्याच्या मेट्रोला रेड सिग्नल

By admin | Updated: August 20, 2014 00:10 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणो मेट्रोबाबत अटींची पूर्तता झाली नसल्याचा दावा केला.

पुणो : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणो मेट्रोबाबत अटींची पूर्तता झाली नसल्याचा दावा केला. मात्र, पुणो महापालिकेने तीन आठवडय़ांपूर्वीच 1क् अटींची पूर्तता करून अहवाल केंद्र शासनाला पाठविल्याचा दावा केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोविषयी दुजाभाव केल्याच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येत असून, पुणो मेट्रोबाबत महायुती व आघाडीत निव्वळ राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
केंद्रात आघाडी सरकारची सत्ता असताना केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी पुणो व नागपूर महापालिकांना मेट्रोच्या अहवालात सुधारणा करून 1क् अटींची पूर्तता करण्याचे आदेश जानेवारी 2क्14 मध्ये दिले होते. त्यानंतर पुणो व नागपूर महापालिकांनी अटींची पूर्तता करून अहवाल केंद्र शासनाला पाठविला होता. मात्र, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. त्यानंतर गेल्या आठवडय़ात केवळ नागपूर मेट्रोला मंजुरी देण्याची घोषणा करण्यात आली.  त्यावरून मुख्यमंत्री चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या धोरणावर 
टीका केली. 
ते म्हणाले की केंद्र शासनाकडे पुणो व नागपूर मेट्रोचे प्रस्ताव एका वेळी पाठविले. मात्र, त्यामध्ये दुजाभाव करून केवळ नागपूर मेट्रोला मान्यता देण्यात आली. त्यामध्ये राजकारण केले जात असून, त्यामुळे राज्यात चुकीचा संदेश जात असल्याची टीका त्यांनी थेट नितीन गडकरी यांचे नाव न घेता केली होती. मात्र, पुणो महापालिका व राज्य शासनाने अटींची पूर्तता अद्याप न केल्यामुळे पुण्याच्या मेट्रोला मंजुरी मिळाली नाही. त्याचे अपयश मुख्यमंत्री आमच्यावर 
ढकलत असल्याची टीका गडकरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत 
केली होती. 
त्याविषयी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला यांच्याकडून वस्तुस्थितीची माहिती घेतली. त्या वेळी ते म्हणाले, की राज्य शासनाच्या सूचनेनुसार केंद्र शासनाने दिलेल्या 1क् अटींची पूर्तता महापालिकेने केली आहे. त्यामध्ये नगरविकास, रेल्वे, नियोजन विभाग, आयबी व गृहनिर्माण याविषयीच्या अटी होत्या. त्यांची पूर्तता करून अहवाल 2 ऑगस्टला केंद्र शासनाला पाठविला आहे. 
आठ ऑगस्टला त्यांना अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुणो मेट्रो प्रकल्पासंबंधी आता कोणतीही त्रुटी राहिलेली नाही. महापालिका प्रशासनाने अटींची पूर्तता केल्याचा दावा केल्याने गडकरी यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे 
स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.(प्रतिनिधी)
 
एसपीव्हीची नोंदणी सुरू..
राज्य शासनाने मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापनेचे आदेश दिले आहेत. मात्र, कंपनी कायद्यात बदल झाल्यामुळे नवीन कायद्यानुसार नोंदणी सुरू आहे. परंतु, एसपीव्ही नोंदणी प्रक्रियेचा व अटींच्या पूर्ततेचा संबंध नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
 
मेट्रो प्रकल्पामध्ये राजकारण आणून दुजाभाव केला जात आहे. पुणो मेट्रो प्रकल्प व नागपूर मेट्रो प्रकल्प यांचे प्रस्ताव एकाच वेळी गेले मात्र, पुढे नागपूर मेट्रोला हिरवा कंदील मिळाला तर पुणो मेट्रो मात्र रखडली.