राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला

By Admin | Updated: December 19, 2014 14:20 IST2014-12-19T14:20:17+5:302014-12-19T14:20:17+5:30

सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारे पुणे आता राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट शहर बनले आहे.

Pune's first list of corrupt cities in the state | राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला

राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारे पुणे आता राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट शहर बनले आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरण दाखल झाली आहेत. 
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१४ मधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुणे विभागात तब्बल २०४ भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असून यामध्ये २१६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये २०७ भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असून याप्रकरणी २१२ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वात कमी गुन्हे मुंबईत घडले असून मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८१ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ९१ जणांना अटक करण्यात आली आहे. तर औरंगाबाद १५१ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये १६४ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Pune's first list of corrupt cities in the state