शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मनपामध्ये शहरालगतच्या उरळी आणि फुरसुंगीचाच समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:48 IST

पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पत्र सादर केले.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19 -  पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पत्र सादर केले. यामध्ये राज्य सरकारने केवळ उरळी आणि फुरसुंगी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुढील तीन वर्षात टप्याटप्याने 34 गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश तर फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पूर्ण अशा 11 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.
 
पुण्या भोवतालच्या  34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणं मांडताना राज्य सरकारने केवळ दोन गावांचा समेवश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
 
गावांच्या समावेशासाठी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 12 जून रोजी झालेल्या सुनावणीत या गावांबाबत तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार आज राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
 
मात्र, पहिल्या टप्यात 11 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. कारण पालिकेत सर्व गावांचा समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षात टप्याटप्यात गावचा समावेश करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश करण्यात येणार आहे. तर उरुळी देवाची आणि फुरसूंगी ही गावे पूर्णपणे समाविष्ट करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. तर उर्वरित 23 गावे पुढील 3 वर्षात टप्याटप्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.
या अकरा गावांचा होणार पहिल्या टप्प्यात समावेश-
उरुळी देवाची , फुरसुंगी बावधन बुद्रुक, लोहगाव (उर्वरित), हडपसर (साडेसतरानळी), मुंढवा (उर्वरित केशवनगर), शिवणे (उर्वरित), धायरी (उर्वरित), उंड्री, आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक.
(सोलापूर-पुणे ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ १५ वर्षांची झाली)
(पुणे - डेक्कन क्वीन अडवणा-या महिला प्रवाशी "राष्ट्रद्रोही", रेल्वेचा अजब कारभार)
(औरंगाबाद-पुणे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम घेतले काढून)