शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या संरक्षणाबरोबर पर्यावरण रक्षणही - जावडेकर

By admin | Updated: June 2, 2014 00:14 IST

माहिती व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आश्वासन

पुणे : गेल्या काही वर्षांत पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली देशाच्या संरक्षणासह हजारो प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. परंतु, देशाच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यात येईल, त्याचवेळी पर्यावरण रक्षणाची काळजी घेऊन विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन माहिती व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. प्रकाश जावडेकर यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच आज पुण्यात आले. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, गटनेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत जावडेकर यांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच मंत्र्यांना लोकोपयोगी कामे प्रधान्याने हाती घेण्यास सांगितले आहेत. तसेच, प्रत्येक खात्याचा कारभार पारदर्शक व वेगवान होण्यासाठी मंत्रिगट रद्द केले आहेत. मंत्रिगट नसले तरी दोन खात्याचे मंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, त्यामध्ये कोणालाही अंहकाराची बाधा नाही. ऑनलाईन प्रकल्प प्रस्ताव स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नवीन पद्धतीने कारभार करण्यासाठी अभ्यास सुरू आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)-------------पुण्यात नदीसुधारणाला प्राधान्यगेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील नदीसुधारणाचे काम सुरू आहे. अहमदाबादमध्ये साबरमती नदी सुधारणेचे काम पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे पुण्यातील नदीसुधारणेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. शिवाय पुण्यातील प्रलंबित प्रश्नांविषयी आणि राज्यातील पर्यावरण विषयक काही प्रश्नांविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. ------------------