शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज देण्याचा प्रस्ताव?

By admin | Updated: September 30, 2015 02:31 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दराबाबत सवलती देण्यासाठी शिफारशी करण्याकरता ऊर्जा विभागाने आज एका समितीची स्थापना केली.

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दराबाबत सवलती देण्यासाठी शिफारशी करण्याकरता ऊर्जा विभागाने आज एका समितीची स्थापना केली. समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष असतील. अमरावती आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त सहअध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये अ‍ॅड.मधुकरराव किंमतकर, आर.बी.गोएंका, प्रशांत मेहता, राम भोगले, रघुनाथ कपाथे, वेदनारायण गुप्ता, चंदू बलदारा, ओमप्रकाश डागा आणि मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सदस्य सचिव असतील.विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना इतर विभागातील उद्योगांच्या तुलनेत येणाऱ्या अडचणी, त्या विभागामध्ये उपलब्ध वीज व त्याचा दर तसेच या विभागांमध्ये उद्योग क्षेत्राचा जलद विकास होण्यासाठी तुलनात्मक अभ्यास ही समिती करेल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीज दराबाबत असलेल्या नियमनाच्या मर्यादेत या विभागातील उद्योगांना वीज दरात सवलत देताना त्याचा विपरित परिणाम इतर ग्राहकांच्या वीज दरावर आणि परवानाधारकांच्या महसुलावर कसा होणार नाही या बाबत समिती अभ्यास करेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक वीज ग्राहकांसाठीच्या प्रचलित वीज दरामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रोत्साहनपर आधारित योजना तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)