शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सक्षमीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: May 26, 2014 01:10 IST

शहरातील वाढत्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरसह मेट्रो रिजनमधील ९ तालुके व विभागातील ६ जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी विभागावर सोपविण्यात आली आहे.

महापालिका : अग्निशमन समिती कामाला लागली

नागपूर : शहरातील वाढत्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरसह मेट्रो रिजनमधील ९ तालुके व विभागातील ६ जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी विभागावर सोपविण्यात आली आहे. या दृष्टीने अग्निशमन विभागाला सक्षम करण्याचा प्रस्ताव अग्निशमन समितीच्या विचाराधीन आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व आगीच्या घटना विचारात घेता अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज करण्याची गरज असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले. याची दखल घेत अग्निशमन समिती विभागाच्या सक्षम करण्याच्या कामाला लागली आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या व बहुमजली इमारतीचा विचार करता विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज आहे. सोबतच फायर स्टेशनची संख्या वाढवावी लागणार आहे. अग्निशमन विभागाची यंत्रणा आजही १९६५ सालच्या लोकसंख्येच्या आधारावर आहे. त्यावेळी ५ फायर स्टेशन व १९३ कर्मचार्‍यांची पदे मंजूर होती.

गेल्या चार दशकात विभागातील कर्मचार्‍यांची संख्या वाढण्याऐवजी ती १४९ पर्यंंंत खाली आली आहे. शहरातील लोकसंख्या ३0 लाखांवर गेली असतानाही अद्यापही ५ फायर स्टेशन मंजूर असल्याची माहिती समितीचे सभापती किशोर डोरले यांनी दिली.

लोकसंख्येचा विचार करता मनपाने ३ नवीन स्टेशन सुरू केले आहेत. शासनाकडे ५ नवीन स्टेशनचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. तो मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. वास्तविक अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. राज्य शासनाने निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच दिलेले आहे. त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डोरले म्हणाले. (प्रतिनिधी)