शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे व्यापाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

अजिज कारचे : एलबीटीप्रश्नी कारवाई थांबणार नाही

सांगली : महापालिकेने गेल्या दोन वर्षापासून व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याबाबत वारंवार आवाहन केले आहे, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. नोंदणी व कर न भरणाऱ्या सुमारे ३५० व्यापाऱ्यांना बारा कोटींच्या कराचे मागणीपत्र दिले आहे. लवकरच या व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे आयुक्त अजिज कारचे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. व्यापाऱ्यांच्या दुकानांवरील छाप्याचे समर्थन करीत मुख्यमंत्र्यांनीही व्यापाऱ्यांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांनाही ते प्रतिसाद देत नसल्याचे कारचे यांनी सांगितले. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी आज गणपती पेठेतील एका दुकानावर छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त कारचे म्हणाले की, एलबीटीबाबत प्रशासन कारवाई करीत नाही, असा आरोप नगरसेवक करीत आहेत. वस्तुत: कारवाईची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. वारंवार नोटिसा बजावून सुनावणी घेतली आहे. विक्रीकर विभागाकडे व्यापाऱ्यांनी भरलेल्या परताव्यावरून त्यांच्या उलाढालीचे आकडे निश्चित केले आहेत. त्यानुसार ३५० व्यापाऱ्यांना १२ कोटी रुपये कर भरण्याची नोटीस बजाविली आहे. नोंदणी व कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या उलाढालीवरही लक्ष आहे. हा शेवटचा टप्पा असून नोटिसीची मुदत संपताच मालमत्ता जप्त करून लिलाव काढण्याची प्रक्रिया हाती घेणार आहे. कारवाईत खंड पडत असल्याच्या आरोपास नकार देत ते म्हणाले की, दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर कारवाई थांबविणे भाग आहे. अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही लेखी आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आता कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. (प्रतिनिधी)