शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये छापा; ५५ कोटी रुपयांची तूरडाळ जप्त

By admin | Updated: October 28, 2015 02:07 IST

राज्यात तूरडाळीच्या गोदामांवर धाडसत्र सुरू असताना, खालापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने पेण-खोपोली राज्यमार्गावर रानसई येथे डाळ कंपनीवर छापा टाकून ५५ कोटी रुपयांचा बेकायदा साठवून ठेवलेला

खालापूर : राज्यात तूरडाळीच्या गोदामांवर धाडसत्र सुरू असताना, खालापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने पेण-खोपोली राज्यमार्गावर रानसई येथे डाळ कंपनीवर छापा टाकून ५५ कोटी रुपयांचा बेकायदा साठवून ठेवलेला डाळसाठा जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डाळीचा साठा सील करण्यात आल्याने, कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. तूरडाळीची किंमत अवास्तव वाढल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली असताना, डाळीचा कृत्रिम साठा करणाऱ्यांवर राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने, राज्यात सर्वत्र डाळीच्या साठ्यांवर धाडी पडत आहेत. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील रानसई येथे, ईटीसी अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या गोडाउनमध्ये तूरडाळीचा असणारा ६० हजार टन साठा छापा टाकून सील करण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हापुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शशिकांत नाचण आणि त्यांचे सहकारी तालुका पुरवठा अधिकारी भोळे, एस. टी. यमाजी, साळुंखे, मंडळ अधिकारी नाईक, तलाठी भरत सावंत, मिरगने, प्रशांत ढाकणे, अजित जाधव यांच्याकडून दोन दिवस डाळीची मोजदाद सुरू होती. कंपनीमध्ये परदेशातून मागविण्यात आलेल्या डाळीचा ६० हजार टन साठा या वेळी आढळून आल्याने आणि साठा करण्यासाठी आवश्यक परवानगी नसल्याचे कारवाईत उघड झाले आहे. याबाबत खालापूर पोलीस स्थानकात कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीमध्ये परदेशातून आयात केलेल्या तूरडाळीचा मोठा साठा आढळून आला आहे. या वेळी छाप्यादरम्यान कंपनी प्रशासनाचे परवाने तपासणी करण्यात आले असताना, राज्य शासनाच्या तहसील पुरवठा विभागाकडून देण्यात येणारा परवाना कंपनी प्रशासनाकडे नसल्याचे समोर आल्याने, हा साठा जीवनाश्यक वस्तू साठा अधिनियम आणि महाराष्ट्र शेडुल्ड कमोडिटी २०१५च्या अटी-शर्थीचा भंग केल्यासंबंधी खालापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे, असे खालापूरचे तहसीलदार शशिकांत नाचण यांनी सांगितले.