शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By admin | Updated: October 7, 2014 05:38 IST

निवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत.

पंकज रोडेकर, ठाणेनिवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. त्या दृष्टीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच विविध आंदोलनांमध्ये भाग घेणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई या भागांत पोलिसांनी ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक करवाई केली आहे. लोकसभा निवडणूक जिल्ह्यात पूर्णपणे शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीत बिघाडी झाल्याने ते-ते पक्ष निवडणूक आखाड्यात आमने-सामने उतरले आहेत. तसेच इच्छुकांना उधाण आल्याने जिल्ह्यात २३८ उमेदवार रिंगणात आहेत. साधारणत: प्रत्येक मतदारसंघात १० उमेदवार आहेत. सर्वाधिक २२ उमेदवार उल्हासनगर मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक १ हजार ४०९ प्रकरणांपैकी ९०६ जणांवर कारवाई केली आहे. यात ठाणे पोलिसांनी ३५४, नवी मुंबई पोलिसांनी १२१ तर ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४३१ जणांवर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)