शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे बालमृत्यू टाळण्यासाठी गाभा समिती

By admin | Updated: September 28, 2015 02:37 IST

राज्यातील १६ आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाने २०१३ मध्येच गाभा समिती गठित केली आहे

सुहास सुपासे , यवतमाळ राज्यातील १६ आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाने २०१३ मध्येच गाभा समिती गठित केली आहे. या समितीला अधिक क्रियाशील बनविण्याच्या हेतूने यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करून समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही समिती नव्या जोमाने कामाला लागून राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. गाभा समिती ज्या १६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसह गोंदिया, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, रायगड, ठाणे, पालघर या आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. आदिवासी भागातील बालमृत्यूचा दर कमी करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत १४ आॅगस्ट २०१३ रोजी शासन निर्णयान्वये गाभा समिती गठित केली आहे. या गाभा समितीच्या पाचव्या बैठकीत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व गृह विभागाचे (गृह विशेष) सचिव यांचा गाभा समितीमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील बालमृत्यू व अन्य समस्यांशी फारसे संबंधित नसलेल्या शालेय शिक्षण विभाग, नगरविकास विभाग व उद्योग विभागाच्या सचिवांना समितीतून वगळण्याचा निर्णय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव राहतील तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास विभाग, रोजगार हमी योजना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग आदी विभागांचे सर्व प्रधान सचिव गाभा समितीचे सदस्य राहतील. सोबतच सदस्यांमध्ये राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण अभियान, मुंबईचे महासंचालक आणि या सोळाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचाही सदस्य म्हणून समावेश राहील. स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून नागपूर येथील पौर्णिमा उपाध्याय, गडचिरोली येथील ‘सर्च’ या संस्थेचा प्रतिनिधी, ‘नर्मदा बचावो आंदोलन’ नंदुरबार या संस्थेचा प्रतिनिधी, ठाणे येथील कष्टकरी स्वयंसेवी संस्था, नाशिक येथील वचन संस्थेचा प्रतिनिधी तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक राहतील. आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या भागात विविध कारणांमुळे आणि आजारांमुळे बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध संस्था आणि शासन आपापल्या परीने कार्य करीत असले, तरी हे प्रमाण अद्यापही पाहिजे तसे कमी न झाल्याने शासनाच्या आदिवासी विभागाने गाभा समितीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून पुनर्रचना केली आहे. येत्या काळात या समितीच्या कुशल कार्यतत्परतेमुळे आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होणार, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.