शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती झिंटाची नेस वाडियाविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By admin | Updated: June 14, 2014 04:27 IST

प्रसिद्ध अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने तिचा माजी प्रियकर प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने तिचा माजी प्रियकर प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. कलम ३५४ अंतर्गत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी सांगितले की, नेस वाडिया व प्रीतीचे गेली पाच वर्षे प्रेमसंबंध होते. या काळात नेसने तिला दादर येथे घरही दिले आहे. त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याची चर्चा असली तरी कुरबुरी सुरुच होत्या. तरीही तो तिच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लष्करी शिस्तीतील प्रीती खेळाच्या मैदानावरही प्रेमातील हा खिलाडूपणा स्वीकारायला तयार नव्हती.३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर पंजाब आणि चेन्नईविरुद्ध सामना दरम्यान गरवारे पॅव्हेलियनमध्ये नेस तिच्याशी उद्धटपणे बोलला, शिवीगाळ करून झटापट केली. घटनेनंतर १३ दिवसांनी स्वत: प्रीतीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्यांनी ही घटना पाहिली त्या सर्वांची चौकशी करून तसेच वाडिया यांचीही चौकशी करु, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नेस वाडियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे ऐकून मला धक्का बसला. हे आरोप पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे आहेत.