शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद लाड यांना प्रचारात कुटुंबाची मोलाची साथ

By admin | Updated: October 9, 2014 04:13 IST

म्हाडा इमारत दुरुस्ती-पुनर्रचना मंडळाचे सभापती आणि सायन कोळीवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रसाद लाड यांचा प्रचार घराघरात व्हावा

मुंबई : म्हाडा इमारत दुरुस्ती-पुनर्रचना मंडळाचे सभापती आणि सायन कोळीवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रसाद लाड यांचा प्रचार घराघरात व्हावा, त्यांचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. यात त्यांच्या कन्या सायली आघाडीवर आहेत.शिक्षण, स्वच्छता, सुरक्षा, स्वास्थ्य, समृद्धी हे मुद्दे घेऊन मतदारसंघात लाड यांनी प्रचार सुरू केला आहे. प्रचारात त्यांना कार्यकर्त्यांसोबतच पत्नी नीता आणि कन्या सायली यांची मोलाची साथ मिळते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नीता यांनी मतदारसंघात महिला बचत गटांचे जाळे विणले. त्या माध्यमातून सध्या नीता प्रचारात उतरल्या आहेत. याशिवाय त्या पदयात्रा आणि चौकसभाही घेत आहेत. सायन कोळीवाडा मतदारसंघातली बहुतांश जनता झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करते. नीता यांनी या झोपडपट्ट्यांमधल्या घराघरात लाड यांचे नाव व त्यांचे कार्य पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. आम्ही कामे वाटून घेतलेली आहेत. ज्या ठिकाणी लाड जाऊ शकत नाहीत तेथे मी पोहोचते, असे नीता सांगत होत्या.लाड आणि त्यांच्या पत्नी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करीत आहेत, तर त्यांच्या कन्या सायली सोशल मीडियावरून आपल्या वडिलांचा प्रचार करीत आहेत. वडिलांचे कार्य, त्यांची राजकीय कारकिर्द, उद्याच्या प्रचाराचे शेड्युल याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती त्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅपवरून सर्वदूर पोहोचवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पक्षकार्यालयाशी आवश्यक असलेला समन्वयही त्याच ठेवत आहेत. (प्रतिनिधी)