शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:15 IST

Vidhan Parishad Election News: मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी आल्याने चुरस वाढली आहे. यामुळे ११ जागा असल्या तरी १२ उमेदवार झाले आहेत. यामुळे मतांचे गणित कोण कसे जुळवणार, असा प्रश्न पडला आहे. नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या किंवा शेकापच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असे सुतोवाच शिंदे गटाने केले आहे. यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होणार आहे. 

मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातही नाराजी आहे. तसेच नार्वेकरांचेही सर्वच पक्षात मित्र आहेत. यामुळे याचा मविआ फायदा उचलण्याची शक्यता आहे. 

सध्याच्या संख्याबळानुसार महायुती त्यांचे ८ उमेदवार निवडून आणू शकते. तर दोन मविआ निवडून आणू शकते. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मते जुळवावी लागणार आहेत. ही मते जुळली तरी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. शिंदेंनी बंड करण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे उद्भवणार असल्याचे भाकीत सरनाईक यांनी केले आहे. 

मविआचे बलाबल...
मविआच्या तीन प्रमुख पक्षांकडे ६५ आमदार आहेत. तर त्यांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या अपक्ष आणि मित्र पक्षांकडे ९. तर महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडे भाजप व छोटे मित्रपक्ष ११०, राष्ट्रवादी ४३ आणि शिवसेना ४८ असे एकूण २०१ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला २३ मतांची गरज आहे. हे पाहिल्यास महायुती ८ उमेदवार नक्कीच निवडून आणू शकते. परंतू, तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला ४ मतांची गरज आहे. तर महायुतीला ९ वा उमेदवार जिंकविण्यासाठी ६ मतांची गरज आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण फुटतो, यावर हे गणित ठरणार आहे. नार्वेकरांनी महायुतीची मते फोडली तर महायुतीला ८ जागा जिंकता येणार आहेत. 

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेना