शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची पार्सल सेवा आता शेवटच्या खेड्यापर्यंत

By admin | Updated: October 9, 2014 03:30 IST

देशभरात लहानातील लहान खेड्यापर्यंत सेवाजाळे असणाऱ्या भारतीय टपाल विभागाने आता पार्सल डिलिव्हरी क्षेत्रातही आघाडी घेतली आहे.

संकेत सातोपे, मुंबई देशभरात लहानातील लहान खेड्यापर्यंत सेवाजाळे असणाऱ्या भारतीय टपाल विभागाने आता पार्सल डिलिव्हरी क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. ‘एक्सप्रेस आणि बिझिनेस पार्सल’ नावाने टपाल खात्याने सुरू केलेल्या नव्या सेवांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या सेवांचा लाभ घेत खेड्यापाड्यांत व्यवसाय वाढविण्यासाठी आघाडीच्या अनेक आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांनी टपाल खात्याशी करार केले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातही आॅनलाइन शॉपिंगचा लाभ घेता येणार आहे.टपाल खात्याने डिसेंबर २०१३ मध्ये ‘एक्सप्रेस आणि बिझिनेस’ या दोन पार्सल सेवा देशातील ४७ प्रमुख शहरांत सुरू केल्या. या पैकी एक्सप्रेस सेवेअंतर्गत पार्सल वायूमार्गे पाठविण्यात येणार असल्यामुळे ही सेवा अतिजलद आहे. तर ‘बिझिनेस’ सेवेअंतर्गत खुष्कीच्या मार्गाने पार्सल पोहोचविण्यात येतात. या सेवांना खासगी उद्योजकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, टपाल खात्याने १ आॅक्टोबरपासून ही सेवा ४७ शहरांसोबतच देशभरातील प्रत्येक खेड्यापर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या सेवांमुळे आॅनलाइन किंवा दूरध्वनीवरून नोंदणी केलेल्या वस्तु पोस्टाच्या देशभरात पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे सोपे झाले आहे. त्यामुळे ‘अ‍ॅमेझोन, फ्लिपकार्ट, टेलिब्रॉण्ड, टीव्हीसी इंडिया’ या आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांनी टपाल खात्याशी करार केले आहेत. तसेच, इबे, स्रॅपडिल यांच्याशी नवे करार होण्याच्या मार्गावर आहेत. या करारांनुसार, कंपन्यांना त्यांचे ३५ किलोपर्यंतचे पार्सल वायूमार्गाने देशातील कोणत्याही कोपऱ्यात पाठविणे शक्य होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र टपाल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.या नव्या सेवेच्या माध्यमातून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत टपाल खात्याने ४७ शहरांत ४ लाखांहून अधिक वस्तू पोहोचविल्या आहेत. आणि त्यातून तब्बल ५ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.भारतीय टपाल खात्याचे सेवाजाळे जगातील सर्वात मोठे मानले जाते. टपाल खात्याची देशभरात १ लाख ५५ हजार १५ हून अधिक कार्यालये आहेत. त्यापैकी ८९.७६ टक्के म्हणजेच १ लाख ३९ हजार १४४ कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत.