शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर - नितीन गडकरी

By admin | Updated: May 5, 2015 11:40 IST

जकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नागपूर : राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.  'राजकारणात कोणीही समाधआनी नाही, नगरसेवकाला आमदार तर आमदाराला मंत्री व्हायचे असते. मंत्र्यांना चांगली खाती हवी असतात. तर मुख्यमंत्र्यांसमोर राज्याचा कारभार असताना त्यांना केंद्रात जायचे असते. इथे कोणीही तृप्त नसते. महत्वाकांक्षा प्रत्येकालाच पळायला लावत असते' असेही गडकरी म्हणाले. 
दहशतवादी विचारांमुळे अनेक देशांतील स्वातंत्र्य, समता व बंधूभाव नष्ट होत आहे. लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता व समाजवाद संकटात आहे. अशा परिस्थितीत जगाला दिशा दाखविण्याची शक्ती केवळ बुद्ध विचारात आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गडकरी या कार्यक्रमासाठी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी तर, दिल्ली विद्यापीठाचे बौद्ध अध्ययन विभागप्रमुख भदंत डॉ. सत्यपाल व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम प्रमुख अतिथी होते. 
गडकरी म्हणाले, अनेक देशांनी अणुशस्त्रे विकसित केली असून,काही अणुशस्त्रांची संहारक शक्ती कल्पनातीत आहे. यामुळे सर्वत्र तणाव व अशांतता पसरली आहे. भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करायची, यावर संपूर्ण जगात विचारमंथन सुरू आहे. याचे उत्तर केवळ बुद्ध विचारात आहे. देशाच्या प्रगतीसाठी ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक आहे; पण त्याशिवाय मूल्यांचे जतन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विकासासोबत विविध प्रकारचे दोष येत असतात. त्यावर केवळ मूल्यांच्या बळावरच मात करता येते. 
शैक्षणिक क्षेत्र अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. शिक्षणातील गुणात्मकता व सर्वसमावेशकता वाढली पाहिजे. शिक्षणाचा संशोधन व राष्ट्रविकासाकरिता उपयोग झाला पाहिजे. विज्ञानामुळे देशातील गरिबी दूर होऊ शकते. जगातील कोणताही धर्म वाईट नाही. हा प्रत्येकाच्या विश्‍वासाचा भाग आहे. समस्या प्रत्येक क्षेत्रात असून सर्व प्रश्न सोडविण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे त्यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी संचालन केले तर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांनी आभार मानले.
'धम्मरत्न सर्वश्रेष्ठ आहे. शासनाला बुद्ध विचाराचे महत्त्व पटले आहे. यामुळे बुद्ध विचारांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबवून अनुदान दिले जात आहे. पाली भाषेत बुद्ध धम्मासह अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. संस्कृत व पाली भाषा एकमेकांच्या भगिनी आहेत'
-भदंत डॉ. सत्यपाल
'सर्व देश अणुशस्त्रांनी परिपूर्ण आहेत. या अणुशस्त्रांमध्ये संपूर्ण मानवजातीचा चारवेळा संहार करण्याची क्षमता आहे. कोणत्याही देशाची मानसिकता बदलल्यास काय होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी. भविष्यात बुद्धाची शिकवणच जगाच्या कामी येणार आहे. '
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे
(प्रतिनिधी)