शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘नीति’मुळे राज्याच्या निधीत घट; सभापतींनी दिले चर्चेचे निर्देश

By admin | Updated: July 23, 2015 01:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोग गुंडाळून नीति आयोग स्थापन केल्यानंतर काही योजना गुंडाळल्याने, तर काही योजनांच्या निधीतील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोग गुंडाळून नीति आयोग स्थापन केल्यानंतर काही योजना गुंडाळल्याने, तर काही योजनांच्या निधीतील केंद्राचा हिस्सा कमी केल्याने महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत ३,५०० कोटी रुपयांची घट झाल्याचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेत गाजला. संजय दत्त यांनी तो उपस्थित केला. राज्याचा निधी कमी होण्याबाबत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर याबाबत चर्चा करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.नीति आयोगाने सुमारे २६ योजना बंद करण्याचा, तर २० योजनांना केंद्रीय निधी कमी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हे वृत्त दिले होते. संजय दत्त म्हणाले की केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्याला मिळणाऱ्या निधीत घट होत असून, गोरगरिबांच्या अनेक योजनांकरिता निधी उपलब्ध होणार नाही. माणिकराव ठाकरे म्हणाले की मागास भागाच्या व मागासवर्गीयांच्या योजनांना यामुळे कात्री लागणार आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, की राज्याला मिळणाऱ्या निधीतील पैसे कमी होणार नसले तरी वित्त आयोगाच्या मार्फत मिळणारा निधी ८,५०० कोटी रुपये अधिक असल्याने राज्याला मिळणाऱ्या निधीत ५,००० कोटींची वाढ होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बंद केलेल्या तसेच निधी कपात केलेल्या योजना राज्य सरकारने सुरू ठेवाव्यात. शेकापच्या जयंत पाटील यांनीही या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त करताना याचा थेट परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पावर होणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रकाश गजभिये यांनी नीति आयोगाचे नाव बदलून नियती आयोग केले असते तर अधिक चांगले झाले असते. मागासवर्गीयांच्या योजनांचे ४० हजार कोटी रुपये केंद्रातील नव्या सरकारने बंद केले, असे मत व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)