शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या खबऱ्यांची ‘दिवाळी’

By admin | Updated: October 27, 2014 02:34 IST

पोलिसांना खबर देण्यासाठी आलेल्यांची गर्दी सध्या बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध युनिटला टीप देण्याकडे या खब-यांचा कल आहे

ठाणे : पोलिसांना खबर देण्यासाठी आलेल्यांची गर्दी सध्या बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध युनिटला टीप देण्याकडे या खब-यांचा कल आहे. कोणी केवळ मैत्रीसाठी तर कोणी दोन पैसे मिळवण्यासाठी खबरी होत आहेत. पोलीसही दिवाळीनिमित्त खब-यांना पदरमोड करून बक्षीस देत आहेत. त्यामुळे खबऱ्यांची ‘दिवाळी’ झाली आहे. पोलिसांचे खबरी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून पोलिसांसाठी इमानेइतबारे काम करतात. अशीच काही मोठी खबर मिळाली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून खबऱ्यांना शासनाच्या ‘खबरी फंडा’मधून बक्षीस देण्याची सुविधा आहे. पण बरेचदा अधिकृत फंड मिळेपर्यंत खबरी धीर धरीत नाहीत. तो लगेच इतरत्र जातो. त्यामुळे कधी कधी पदरमोड करूनही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपला खबरी जपतात. सध्या सोनसाखळी चोरट्यांनी ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. त्यांना पकडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबऱ्यांचे जाळे पसरवले आहे. काहींना केवळ जेवण दिले तरी चालते. काहींना मात्र लगेच काही हजारांच्या रकमेची अपेक्षा असते. आपला खबरी इतरत्र जाऊ नये म्हणून या खबऱ्यांची पोलीस खातीरदारी करीत आहेत. आज खबर मिळाली नाही तरी कधी तरी हा खबरी उपयोगी पडेल, यासाठी सणावारांच्या काळात पोलीस त्याला बक्षीस देऊन खूश ठेवतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. काही खबरे हे पक्की टीप देतात. गुन्हे अन्वेषण विभागाचे वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी जाधव यांनी अलीकडेच सात कोटींचे रक्तचंदन अंबरनाथमधून हस्तगत केले. ही खबर देणाऱ्याने फारशी अपेक्षा ठेवली नाही. त्याच्यासाठी जेवण व इतर खर्च केल्याचे जाधव यांनी सांगितले. तर अमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी म्हणाले, काही खबरी केवळ दोन-तीन दिवसांचे जेवण सुटावे इतक्या साध्या अपेक्षेने येतात. एखादा खबरी खोटी माहिती देत असेल तर लगेच समजते. पण तरीही त्याकडे आम्ही मुद्दाम दुर्लक्ष करतो. क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी खबऱ्याने मदत केली तर पाच ते दहा हजार रुपये बक्षीस म्हणून द्यावे लागतात. शस्त्र तस्करी किंवा खुनाच्या प्रकरणाची माहिती देणाऱ्यांना मोठ्या मोबदल्याची अपेक्षा असते. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने निवडणूक काळात दोन लाखांच्या बनावट नोटाही खबऱ्यांच्या माहितीच्या आधारेच पकडल्याचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)