शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीच बनत आहे मृत्यूचे द्वार

By admin | Updated: June 23, 2014 03:48 IST

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस कोठडींमध्ये तब्बल १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांतील त्यांची संख्या १६वर पोहोचली आहे

जमीर काझी, मुंबईगेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस कोठडींमध्ये तब्बल १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांतील त्यांची संख्या १६वर पोहोचली आहे. दरवर्षी या प्रमाणात वाढ होत असल्याने कोठडी म्हणजे जणूकाही मृत्यूचे द्वार बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस कोठडीतील मृत्यू झालेल्यांमध्ये विविध गुन्ह्यांतील तपासासाठी आणलेल्या आरोपी, संशयितांचा समावेश आहे. कोठडीतील मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांकडून मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्यात अटक केलेले आरोपी, संशयितांशी करावयाच्या वर्तणुकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नियम घालून दिले आहेत. कैद्यांच्या मानवी हक्कावर कोणतीही गदा न आणता गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलीस कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने माहिती मिळविली असता ४ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर आली.राज्यामध्ये २०१० साली विविध पोलीस ठाण्यांत २४ जणांचा मृत्यू झाला. ११ व १२मध्ये ते प्रमाण अनुक्रमे ३५ व ३६ पर्यंत वाढले. तर गेल्या वर्षी तब्बल ४७ जण पोलीस कोठडीत मरण पावले. चालू वर्षात जानेवारीपासून ३१ मेपर्यंत १६ जणांच्या आयुष्याचा शेवट झाला आहे.