पोलीस निरीक्षक घाडगेला पोलीस कोठडी

By Admin | Updated: September 3, 2015 00:53 IST2015-09-03T00:53:31+5:302015-09-03T00:53:31+5:30

दोन लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक झालेल्या पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगेला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Police Inspector Ghadgele Police Cell | पोलीस निरीक्षक घाडगेला पोलीस कोठडी

पोलीस निरीक्षक घाडगेला पोलीस कोठडी

कल्याण : दोन लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक झालेल्या पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगेला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर लाचखोरीचादेखील आरोप असून, त्यासंदर्भात मिळालेल्या अंतरिम जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार असून यावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.
लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेल्या घाडगेने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यात त्याला ३ सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पूर्वाश्रमीचे सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी शनिवारी घाडगेविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्याच्यासंदर्भात असलेले चौकशीचे प्रकरण दडपण्यासाठी घाडगेने दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणात घाडगेला मुंबई-मानखुर्द परिसरातून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान, त्याच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यावसायिकानेही तक्रार केल्याची माहिती बाजारपेठ
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Police Inspector Ghadgele Police Cell