शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 05:29 IST

कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, गणेश विसर्जन स्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात

मुंबई : कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, गणेश विसर्जन स्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात महिला पोलीस शिपाई दहिबावकर गंभीर जखमी झाल्या. बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या गणेश विसर्जन तलावाच्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई दहिबावकर या त्यांच्या सहकाऱ्यांसह कर्तव्य बजावत होत्या. गणेश विसर्जन करण्यासाठी पोलीस घाई करत असल्याच्या रागातून, रात्री दहाच्या सुमारास तीन तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेकीमध्ये दहिबावकर यांच्यासह चंद्रकांत सुतार हे गणेशभक्त गंभीर जखमी झाले. दगडफेक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दहिबावकर आणि सुतार यांच्यावर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून, २६ वर्षीय संदेश सुतार याला अटक केली आहे. दगडफेकीमध्ये सामील असलेल्या अन्य दोन तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.