पंतप्रधानांनी साधला नागपूरच्या मुलींशी संवाद

By Admin | Updated: August 11, 2015 02:50 IST2015-08-11T02:50:01+5:302015-08-11T02:50:01+5:30

नागपूर येथील वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वसतिगृहातील मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व संवाद साधला. त्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन

PM talks to Nagpur girls | पंतप्रधानांनी साधला नागपूरच्या मुलींशी संवाद

पंतप्रधानांनी साधला नागपूरच्या मुलींशी संवाद

नवी दिल्ली : नागपूर येथील वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वसतिगृहातील मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व संवाद साधला. त्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी पुढाकार घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सुरु झालेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गंत नागपूर येथील वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वसतिगृहातील मुलींना मोफत दिल्ली भ्रमंतीसाठी आणले आहे.
या मुलींच्या चमूमधे महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलींचा, तसेच ईशान्य भारतातील काही मुलींचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: PM talks to Nagpur girls