शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षड्यंत्र

By admin | Updated: July 27, 2014 01:22 IST

छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून मागासवर्गीयांना प्राप्त संविधानिक आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे,

आरक्षण दिवस : परिसंवादातील वक्त्यांचा सूर नागपूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून मागासवर्गीयांना प्राप्त संविधानिक आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे, असा इशारा आरक्षणाच्या विषयावर संबंधित परिसंवादात सहभागी वक्त्यांनी दिला.छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आरक्षण दिवस म्हणून पाळली जाते. यानिमित्त समता एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने शनिवारी हिंदी मोर भवन येथे ‘संसदेत प्रलंबित आरक्षण विधेयके’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील अंबिका रे, सेवानिवृत्त माहिती संचालक महेंद्र कौसल, विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जारोंडे, राज घरडे आणि सेंट्रल बँक बहुजन समाज कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रटरी पंजाबराव बडगे हे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी बोलताना अ‍ॅड. अंबिका रे यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत प्रलंबित प्रकरणांची माहिती सादर केली. शासन व न्याययंत्रणा हे दोघेही आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठी दोषी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकार हे कायदेशीररीत्या मान्य करवून घेण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायाला अतिशय महत्त्व दिले होते. आज त्याची किती गरज आहे, हे लक्षात येते. न्यायपालिकेत मागासवर्गीय न्यायाधीशांचे प्रतिनिधित्व नसल्याने मागासवर्गीयांचे विशेषत: आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आंबेडकरवाद्यांनी वकिली व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आपल्या विचारांची मंडळी न्यायपालिकेत आली तर काही तरी होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र कौसल यांनी शाहू महाराजांना आरक्षणाची कल्पना कुठून सुटली याची माहिती सादर केली. नरेंद्र जारोंडे यांनी शाहू फुले आंबेडकरी संघटना विशेषत: कर्मचारी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. पंजाबराव बडगे, राज घरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रदीप गायकवाड यांनी भूमिका विषद केली. गुणरत्न रामटेके यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)