शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलातून सुटली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2015 01:19 IST

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, अकोला पोलीस मुख्यालयातील घटना

अकोला: शस्त्रागार विभागातील पोलीस कर्मचार्‍याकडून अनावधानाने पिस्तुलमधून गोळी सुटल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलीस मुख्यालयात घडली. सुदैवाने गोळी भिंतीवर आदळल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेमुळे पोलीस मुख्यालयामध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचे अंगरक्षक कैलास चौधरी हे महिनाभराच्या सुटीवर जाणार असल्याने, ते रविवारी दुपारी त्यांच्या ताब्यातील पिस्तूल व मॅग्झीनमधील काडतुसाचे दहा राऊंड शस्त्रागार विभागात जमा करण्यासाठी गेले. यावेळी पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागामध्ये (आर्ममोरर) पोलीस कर्मचारी गजानन ढोरे हे कार्यरत होते. कैलास चौधरी यांनी त्यांच्याकडील पिस्तूल ढोरे यांच्या ताब्यात दिले. ढोरे यांनी पिस्तुलातील मॅग्झीन काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मॅग्झीन निघत नसल्याने त्यांनी पुन्हा ते मॅग्झीन जोरकसपणे ओढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पिस्तुलाचे ट्रिगर (घोडा) ढोरे यांचेकडून अनावधानाने दाबल्या गेला आणि पिस्तुलातून सुटलेली गोळी लगतच्या भिंतीवर जाऊन आदळली. गोळी सुटण्याचा मोठा आवाज झाल्याने पोलीस मुख्यालयात तैनात इतर कर्मचार्‍यांनी शस्त्रागार विभागाकडे धाव घेतली. पिस्तुलातील गोळी भिंतीवर आदळल्याचे पाहून पोलीस कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यांनीही पोलीस मुख्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.