शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा फोटो उराशी कवटाळून...

By admin | Updated: August 16, 2014 02:07 IST

सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते.

महागाव (यवतमाळ) : सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते. देशभक्तीपर गीतांच्या आवाजात तिचा हुंदका मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही. १६ वर्षांपासून एक माउली आपला मुलगा आज ना उद्या परत येईल या आशेवर जीवन जगत आहे. महागाव तालुक्यातील सवना येथील पांडुरंग हुलगुंडे हा तरुण केंद्रीय राखीव दलात रुजू झाला. देशाच्या सेवेला आपला मुलगा अर्पण करताना आईचे हृदय भरून आले होते. मोठ्या अभिमानाने ती पांडुरंग देशसेवेसाठी जात असल्याचे सांगत होती. आपला मुलगा देशसेवा करतो, याचा तिलाच नव्हे, तर अख्ख्या गावाला अभिमान होता. पांडुरंग १९९८ साली सवना येथून कर्तव्यासाठी नेपाळच्या दिशेने निघाला. तो सीआरपीएफच्या ९५४ कंपनीत हवालदार म्हणून कार्यरत होता. मात्र तो कर्तव्यावर पोहोचलाच नाही. तो नेमका कुठे गेला याचा थांगपत्ता लागला नाही. आई धुरपताबाई यांनी पांडुरंगचा शोध सुरू केला. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली. माझ्या मुलाचा शोध घ्या, असा टाहो फोडला. परंतु पांडुरंगचा थांगपत्ता लागला नाही. २००९ साली पांडुरंगची पत्नी वंदना यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून पतीच्या शोधासाठी शासन काय करतेय, अशी विचारणा केली. परंतु अद्याप उत्तर मिळालेले नाही.गेल्या १६ वर्षांपासून १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला धुरपताबाई पांडुरंगचे छायाचित्र घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचतात आणि मुलाचा फोटो हृदयाशी कवटाळत राष्ट्रध्वजाला सलामी देतात. त्या वेळी ऐकू येणाऱ्या देशभक्तीपर गीतांनी अश्रू अनावर होतात. ती माउली मुलाच्या आठवणीने रडते. (प्रतिनिधी)