शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घटनेवर शपथ घेण्यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:32 IST

न्यायालयात साक्ष नोंदवताना नास्तिकांना धर्मग्रंथाऐवजी राज्यघटनेवर शपथ घेण्याची परवानगी देण्याचे निर्देश विधी मंत्रालय आणि संबंधित प्रशासनांना द्यावेत, अशी मागणी

मुंबई : न्यायालयात साक्ष नोंदवताना नास्तिकांना धर्मग्रंथाऐवजी राज्यघटनेवर शपथ घेण्याची परवानगी देण्याचे निर्देश विधी मंत्रालय आणि संबंधित प्रशासनांना द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाली काढली.शपथ कायदा, १९६९नुसार साक्ष देणाऱ्या किंवा न्यायालयाला माहिती देणाऱ्या व्यक्तीला देवाच्या नावाने किंवा धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. तर माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी लागते. शपथ घेण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करण्यात यावा, तो म्हणजे राज्यघटनेचा. तसे निर्देश केंद्र सरकारला आणि संबंधित प्रशासनांना द्यावेत,’ अशी मागणी सुनील माने यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. राज्यघटनेवर शपथ घेण्याची परवानगी द्यायची की नाही, याबाबत कायदेमंडळ निर्णय घेईल. आम्ही तसे निर्देश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने माने यांची याचिका फेटाळली. अनेक साक्षीदार देवाच्या नावाने किंवा गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास नकार देतात. कारण त्यांचा यावर विश्वास नाही. मात्र शपथ ग्रहण न केल्याने न्यायालय त्यांची साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे अशा नास्तिक लोकांसाठी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ‘शपथ घेण्यासाठी दोन प्रकार आहेत. एक म्हणजे देवाच्या नावाने दुसरा म्हणजे संपूर्ण खरं सांगेन, असे आश्वासन देणे. जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांनी संपूर्ण खरे सांगण्याचे आश्वासन द्यावे. देवाच्या नावाने शपथ घेतली तर त्या व्यक्तीचा धर्माशी, जातीशी किंवा पंथाशी काहीही घेणेदेणे नसल्याचे स्पष्ट होईल,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)