पोळ यांच्याविरोधात याचिका

By Admin | Updated: July 17, 2014 02:38 IST2014-07-17T02:38:11+5:302014-07-17T02:38:11+5:30

पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले

Petition against Pol | पोळ यांच्याविरोधात याचिका

पोळ यांच्याविरोधात याचिका

मुंबई : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले असून याप्रकरणी पोळ यांच्यावर फौजदारी कारवाइची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे़
गेल्यावर्षी डॉ़ दाभोलकर यांची पुणे येथेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली़
मात्र त्याचवेळी एका मासिकाने पोळ यांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचा दावा केला़ यामुळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याची तक्रार गृहविभागाकडे केली़ त्याची दखल न घेतल्याने पाटील यांनी आता न्यायालयाचे दार ठोठावले. (प्रतिनिधी)

Web Title: Petition against Pol