शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

By admin | Updated: June 20, 2014 03:32 IST

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणाच्या कितीही जागा आल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे, पण जोशी सरांचे त्यांच्या पक्षात किती ऐकले जाते हे मी सांगण्याची गरज आहे का? असा टोमणा लगावत निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमतच्या संपादकीय विभागाशी वार्तालाप करताना ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला बहुजनी चेहरा दिला. ती ओळख आम्ही कायम ठेवण्याचा प्रय} करू. त्यासाठी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आम्ही राबवू. आपल्यासह एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार असे आम्ही चौघे मिळून जो पक्षांतर्गत निर्णय घेऊ, असे तावडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना किती जागा लढवेल हे महत्त्वाचे नाही, तर कोणाच्या कोणत्या जागा निवडून येतात हे पाहून जागांचे वाटप होणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल होतील, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
‘असेल मोदी तर मिळेल गादी’ या भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रोज सह्याद्री विश्रमगृहावर, पक्षाच्या कार्यालयात बसून बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी बोलून टिपणं काढत आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही हवेत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि शेतक:यांच्या नावावर बँका आणि साखर कारखान्यांच्या भ्रष्ट संचालकांना पैसा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे राजकारण आम्ही जनतेसमोर आणू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले. 
काँग्रेस कधीच निधर्मी नव्हती मात्र त्यांची स्वत:ची तशी प्रतिमा तयार केली होती, असे सांगून तावडे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने कायम मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या मतांचे राजकारण केले. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला आहे. हाच विचार घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार 
आहोत, असे तावडे यांनी 
सांगितले.