शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्व आलेल्यांसाठी ‘पेन्शन योजना’

By admin | Updated: March 22, 2017 02:40 IST

राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांत गंभीर जखमींचे प्रमाण अधिक आहे. त्यातील कायमचे अपंगत्व आलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न परिवहन

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांत गंभीर जखमींचे प्रमाण अधिक आहे. त्यातील कायमचे अपंगत्व आलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न परिवहन विभागाकडून केला जाणार आहे. अपघातात अपंगत्व आलेल्यांना दर महिन्याला ‘पेन्शन योजना’ म्हणून ठराविक रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्याचा विचार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रस्ते अपघातांतील जीवितहानी कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग आणि राज्य परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यात रावते म्हणाले, संबंधित निधी वाहन नोंदणीद्वारे उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाशी चर्चाही झाली आहे. रस्ते अपघातांत कायमचे अपंगत्व येणाऱ्यांसाठी योजना आखली जात आहे. वाहन नोंदणी करतानाच वाहन मालकाकडून निधी घ्यायचा आणि त्यानंतर या निधीद्वारे अपंगत्व आलेल्यांसाठी दर महिन्याला आर्थिक मदत द्यायची. ही मदत अपंगत्व आलेल्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी असेल. यासंदर्भात केंद्राकडेही बोलणी सुरू असल्याचे रावते म्हणाले. ग्रामीण भागातील लोकांसाठी दर महिन्याला चार ते पाच हजार आणि शहरी लोकांसाठी दर महिन्याला सात ते आठ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. २0१८ पर्यंत मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली, असे रावते म्हणाले. विभागाचे अत्याधुनिकीकरणदोन वर्षांत विभागाचे अत्याधुनिकीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. वर्षाला ४० कोटींचा निधी मिळत असतानाच यंदा १९० कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. त्याद्वारे बरेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आरटीओमध्ये कॉप्युटराइज्ड ड्रायव्हिंग टेस्ट आणि वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेटची नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच राज्यातील पाच कोटी वाहन चालकांचे अभिलेखही कप्युटराइज्ड प्रणालीत आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यशाळेत परिवहन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)