शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज

By यदू जोशी | Updated: October 16, 2025 08:37 IST

Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. 

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पक्षाच्या कामाकडे लक्ष द्या, कार्यकर्त्यांची कामे करा, तुमच्या या कामगिरीचेही मूल्यांकन पक्षपातळीवर केले जात आहे हे लक्षात ठेवा अशी स्पष्ट समज भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या मंत्र्यांना दिली. 

भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामांचे टार्गेट पक्षाच्या मंत्र्यांना यावेळी देण्यात आले. अनेक आमदारांच्या मतदारसंघात शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत, त्या त्यांनी तातडीने कराव्यात, असे बैठकीत सांगण्यात आले.

निवडणुकांसाठी स्वत:ला झोकून द्या,  पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा अनेक ठिकाणी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कामे तातडीने होत नाहीत. आपले सरकार असतानाही कामे तत्काळ होत नसतील तर ते योग्य नाही. प्रत्येक मंत्र्यांनी पक्षाची कामे लवकर होण्याच्या दृष्टीने व्यवस्था तयार करावी असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. पुढचे दोन महिने पूर्णपणे पक्षाला द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वत:ला झोकून द्या. पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा. पक्षात इच्छुकांची गर्दी आहे. अशावेळी बंडखोरीची शक्यता आहे. ती होणार नाही यासाठी मोर्चेबांधणी करा, असेही यावेळी सांगण्यात आले. 

रा. स्व. संघाने घेतली भाजपसह परिवारातील संघटनांची बैठकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी येथील यशवंत भवन या मुख्य कार्यालयात भाजपचे निवडक मंत्री आणि संघ परिवारातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तीन तास बैठक घेतली. भाजपतर्फे बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये उपस्थित होते. भारतीय संस्कृती व हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाण्यासंदर्भात चिंतन झाले. संघटनेने त्यांच्याकडे असलेले कार्य वाढविणे अपेक्षित आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Focus on Party Work: BJP Ministers Given Warning, Performance Reviewed

Web Summary : BJP leaders urged ministers to prioritize party duties, address worker concerns, and gear up for upcoming local elections. Ministers were instructed to resolve internal disputes and ensure timely appointments. The RSS held meetings emphasizing Hindu values and organizational growth.
टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र