शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत गोळीबार; तरुण ठार

By admin | Updated: July 17, 2014 01:10 IST

जुन्या वादातून देवलापार येथील तरुणाची पवनी येथे गोळीबार करून हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावर

पोलीस व्हॅनसह १२ वाहने पेटविली : जमावाचा रोष; आरोपीच्या नातेवाईकाचे घरही पेटविले
देवलापार : जुन्या वादातून देवलापार येथील तरुणाची पवनी येथे गोळीबार करून हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केला, आरोपीचे घर जाळले. आरोपीच्या दोन ट्रकसह इतर वाहनांचीही जाळपोळ केली. एवढेच नव्हे संतप्त जमावाने पोलिसांची व्हॅनही पेटविली. त्यानंतर देवलापार पोलीस ठाण्यावर जमाव चालून गेला. पोलीस ठाणे जाळण्याच्या प्रयत्नात असताना राज्य राखीव दलाने लाठीमार केला. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते.
धनेश बन्सीधर गुप्ता (२७, रा. देवलापार) असे मृताचे तर स्मित गुप्ता असे जखमीचे नाव आहे. जयसिंग यादवसह आठ ते दहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. धनेश हा ठेकेदार होता. त्याचे पवनी येथे कार्यालय असून लहान भाऊ स्मित याचे मोबाईलचे दुकान आहे. दुपारच्या वेळी दोघेही दुकानात होते. दरम्यान ८ ते १० जण दुकानासमोर आले. त्यांनी समोरील काचा फोडून देशी कट्ट्यातून धनेशच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. त्याला वाचविण्यासाठी स्मित धावला असता त्याला जबर मारहाण केली. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. गोळीबारानंतर धनेश जागीच कोसळला. नागरिकांनी त्याला लगेच देवलापार येथील रुग्णालयात आणले. तेथून नागपूरला हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाला. जखमी स्मितवर सध्या उपचार सुरू आहे. घटनेची माहिती नागरिकांना मिळताच पवनी आणि देवलापार येथे रास्तारोको केला.
पोलीस सूत्रानुसार, देवलापार येथील बाजारात मंगळवारी धनेशला मारहाण झाली. याबाबत धनेशने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर दुसऱ्या गटानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी हे आज, बुधवारी पोलीस ठाण्यात गेले. तेथून पवनी येथे दुकानात जाऊन गोळीबार केला. त्यात धनेशचा मृत्यू झाला तर स्मित जखमी झाला.
या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आरोपीचा नातेवाईक इंदल यादव याचे चोरबाहुली येथील घर पेटविले. यासोबतच एमएच-४०/वाय-७८१८, एमएच-४०/वाय-७७१८ क्रमांकाचे ट्रक, एमएच-४०/पी-७०७ क्रमांकाचा जेसीबी, एमएच-३१/२९८१ क्रमांकाच्या कारसह आणखी एक कार, दोन ट्रॅक्टरची जाळपोळ केली. जमावाची आक्रमकता पाहून देवलापारसह रामटेक, कामठी, कन्हान, खापरखेडा, पारशिवनी, खापा येथून पोलिसांसह राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, जमावाने पोलिसांची दोन वाहने पेटविली. सध्या देवलापार येथे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, प्रभारी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांच्यासह पोलिसांची मोठी कुमक तैनात आहे. चोरबाहुली, पवनी आणि देवलापार येथे तणापूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)