पवारांच्या पाय, कमरेला दुखापत

By Admin | Updated: December 4, 2014 03:17 IST2014-12-04T03:17:50+5:302014-12-04T03:17:50+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली.

Pawar's legs hurt the room | पवारांच्या पाय, कमरेला दुखापत

पवारांच्या पाय, कमरेला दुखापत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली. आज सकाळी त्यांना दिल्लीहून मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात आणण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील निवासस्थानी हिरवळीवर फिरत असताना पवार यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. तत्काळ त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाल्याचे एक्स-रे काढल्यानंतर लक्षात आले. तिथे उपचार सुरू होते, पण मुंबईत उपचार करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर आज सकाळी ११.३० वाजता त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबईत आणून ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यासमवेत पत्नी प्रतिभा आणि कन्या खा. सुप्रिया सुळे होत्या. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा अर्धा सोडून तातडीने ब्रीच कँडीमध्ये पोहोचले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी इस्पितळात धाव घेतली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Pawar's legs hurt the room