शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बॅनरवर पवार-मोदी एकत्र !

By admin | Updated: November 17, 2014 04:28 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा की छुपा पाठिंबा, हे गुऱ्हाळ सुरू असताना घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी सामील झाल्याचे चित्र दिसले.

मनीषा म्हात्रे, मुंबईदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा की छुपा पाठिंबा, हे गुऱ्हाळ सुरू असताना घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी सामील झाल्याचे चित्र दिसले. या अभियानाच्या बॅनरवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र झळकल्याने सगळ््यांच्याच भुवया उंचावल्या. बारामतीत राष्ट्रवादीने स्वच्छता अभियान राबवल्यानंतर मुंबईतही स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी ‘आतून’च सामील झाली आहे. घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेराष्ट्रवादी काँंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू घुगे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या अभियानाच्या जाहिरातीत शरद पवारांसह नरेंद्र मोदी यांचा फोटो लागल्याने आणि या कार्यक्रमात राष्ट्रवादीवर सडकून टीका करणारे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याने जनतेने आश्चर्य व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली.निवडणुकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही, असे अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि स्पष्ट बहुमत अभावी राष्ट्रवादीचा टेकू भाजपाला घ्यावाच लागला. त्यामुळे राष्ट्रवादीलाही तरतरी आली. त्यामुळे हे स्वच्छता अभियान त्याच ‘युती’चा भाग तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू घुगे यांना विचारले असता ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंडित नेहरूंच्या जयंतीदिनी शरद पवारांनी बारामतीत स्वच्छ भारत अभियान राबवले होते. आम्ही राहतो तो विभाग आमचे घर समजून आम्ही येथेही हे अभियान राबवले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्र म दिल्याने त्यांचा फोटो आम्ही आमच्या बॅनरवर लावला. निवडणुका संपल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा जनतेची कामे करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जसे कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि प्रवक्त्यांनाही निमंत्रण दिल्याने ते देखील या कार्यक्रमाला हजर होते, असे घुगे यांनी सांगितले. नेहमीच राष्ट्रवादीवर कडाडून टीका करणारे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत तसेच पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत विचारले. ते म्हणाले, की स्वच्छता अभियान हा काही भाजपाचा कार्यक्र म नाही, तो पंतप्रधानांचा सरकारी कायक्रम आहे. त्यामुळे त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. पंतप्रधानांनी जेव्हा या अभियानाचे पहिले नऊ दूत नेमले, त्यात काँग्रेसचे शशी थरूर देखील होतेच. गांधीजी हे जसे कोणा एका पक्षाचे नाहीत तसेच त्यांच्या नावाने सुरू केलेले हे अभियान देखील कोणा एका पक्षाचे नाही. तसेच जर अन्य पक्षाचा नेता पंतप्रधानांचा फोटो त्यांचा पक्षाचा बॅनरवर टाकत असेल, तर कदाचित हे त्याचे मतपरिवर्तन असू शकेल.