शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार

By admin | Updated: June 8, 2014 17:36 IST

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - राज्यातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखालीच लढवणार असून निवडणुकीनंतर लोकशाहीपद्धतीने निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी दिल्लीतच आनंदी असून राज्यात परतणार नाही असे विधानही शरद पवार यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली.  विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे. याविषयीही पवारांनी भाष्य केले.'मी दिल्लीत आनंदात आहे. आता दिल्लीत सत्तेत नसल्याने मला फिरता येईल. पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल. मात्र राज्यात परतणार नाही' असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाउमेद न होता नव्या जिद्दीने कामाला लागा. जनतेशी संवाद वाढवा. दिल्ली व राज्यात मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असे पवार यांनी सांगितले. 

दिल्लीत सत्ताबदल होताच अल्पसंख्याक दहशतीखाली

दिल्लीत सत्ताबदल झाल्याने सर्व सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली आहे. याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून समाजात तेढ करण्याचे प्रकार घडले. यात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर, व्यक्तींवर हल्ले झाले. या आक्षेपार्ह फोटोशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका इंजिनिअर तरुणाचा बळी गेला. समाजातील लहान घटक दहशतीखाली वावरत असेल तर ते चुकीचे आहे असे पवार यांनी सांगितले. 

दुरुस्ती करा अन्यथा जनताच दुरुस्ती करेल

नेता व कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.