शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष आणि संघटनेची लागणार कसोटी

By admin | Updated: May 25, 2014 00:46 IST

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. निवडणुकीला फक्त २५ दिवस उरले आहेत. एवढय़ा कमी काळात सहा जिल्ह्यात पसरलेल्या मतदारांपर्यंत

पदवीधर निवडणूक : सहा जिल्ह्यात पोहचण्याचे आव्हान

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. निवडणुकीला फक्त २५ दिवस उरले आहेत. एवढय़ा कमी काळात सहा जिल्ह्यात पसरलेल्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. उमेदवारी देणारा पक्ष व आपल्या नेत्यासाठी काम करणार्‍या शिक्षक, कर्मचारी व सामाजिक संघटना यांचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.

पदवीधरसाठी भाजपने महापौर अनिल सोले यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप कुणालाही निवडणूक प्रभारी नेमलेले नाही. राष्ट्रीय नेते खा. नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. २६ ला नरेंद मोदी यांचा थपथविधी आहे. २७ तारखेला नेते नागपुरात येतील.त्यानंतर २८ तारखेला भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे. असे असले तरी महापौर अनिल सोले मतदार भेटींच्या कामी लागले आहेत. सहाही जिल्ह्यात पक्ष संघटनेचे नेटवर्क आहे.

पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एखाद्या सार्वत्रिक निवडणूकीसारखीच ही निवडणूकही कार्यकर्ते लढतील, असा पक्षाला विश्‍वास आहे. डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रचारात काँग्रेसची पक्षसंघटना पाहिजे त्या प्रमाणात उतरल्याचे दिसत नाही. गेल्या निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे तायवाडे यांनी आपले व्यक्तिगत नेटवर्क तगडे केले आहे. शिक्षक, कर्मचारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांना कामी लावले आहे. गेल्या निवडणुकीत तायवाडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बराच वेळ दिला होता. यावेळी ही जबाबदारी कोण पार पाडेल, याकडे लक्ष लागले आहे. शाहु, फुले, आंबेडकर पदवीधर संघटनेकडून रिंगणात उतरणार असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनीही सहाही जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी २७ तारखेला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप कार्यकर्ते उत्साहात आहेत. तर लोकसभेनंतर होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे पराभवाचा डाग पुसून भाजपपुढे आव्हान कायम ठेवण्यासाठी काँग्रेससाठी ही एक चांगली संधी आहे. सध्याचे चित्र पाहता तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)