शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी भरावेच लागणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:00 IST

Parth Pawar News: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी अशा ४२ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. 

पुणे  - मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी अशा ४२ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. 

महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून या विभागाचे मंत्री अर्थात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच शंकास्पद विधान करीत या नोटिशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, दस्त रद्द करायचा असेल तर ४२ कोटी रुपयांचे शुल्क भरावेच लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने विभागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

४२ कोटी भरण्याची नोटीसमुळात ही सरकारी जमीन असताना तेजवानी यांनी ती अमेडिया कंपनीला विकली. जमिनीची किंमत ३०० कोटी रुपये दर्शवून पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर व्यवहार पूर्ण करण्यात आला. यानंतर अजित पवार यांनी व्यवहार रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. व्यवहार रद्द करण्यासाठी पहिला दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी आणि तो रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी भरा, अशी नोटीस दिली.

त्यानंतरही खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्कातून सूट द्यायची आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने आणि चौकशी समितीतील सहा पैकी पाच सदस्य पुण्यातीलच असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, पवार पिता-पुत्रांच्या सर्व जमीन व्यवहार मी मालिका स्वरूपात उघड करणार आहे. - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar's company must pay ₹42 crore for deal cancellation.

Web Summary : Parth Pawar's company faces a ₹42 crore payment for canceling a land deal after stamp duty evasion. Revenue Minister's statement causes confusion. Anjali Damania demands Ajit Pawar's resignation for fair investigation.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारPuneपुणे