शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:25 IST

पुण्यातील जमीन व्यवहाराच्या चौकशी समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे.

Parth Pawar Land Case: पुण्यातील ३०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त सरकारी जमीन व्यवहाराबाबत अखेर तपास अहवाल समोर आला आहे. पुणे येथील मुंडवा परिसरातील अत्यंत मोक्याची सरकारी जमीन एका खासगी कंपनीला विकल्याप्रकरणी आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सूट दिल्याप्रकरणी संयुक्त महानिरीक्षकांच्या यांच्या त्रिसदस्यीय समितीने तत्कालीन सब-रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्यासह तीन जणांना दोषी ठरवले आहे. मात्र यामध्ये पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. कंपनीमध्ये ९९ टक्के भागीदारी असतानाही पार्थ पवार यांचे कसं नाव नाही, असा सवाल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

पुण्यातील मुंढवा परिसरातील सुमारे ४० एकर सरकारी जमीनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणावरुन पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नोंदणी संयुक्त महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या अहवालात पोलिस एफआयआरमध्ये तीन जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवली आहेत. मंगळवारी सादर केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचा उल्लेख नाही कारण त्यांचे नाव कोणत्याही कागदपत्रांमध्ये दिसत नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे. ही जमीन सरकारी मालकीची होती, म्हणजेच ती कोणत्याही खाजगी कंपनीला विकता येत नव्हती. असे असूनही, ती अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती.

या अहवालानंतर राज्य सरकारने तातडीने संबंधित कंपनीला ४२ कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली असून, सात दिवसांत याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राजेंद्र मुंठे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल रवींद्र बिनवाडे यांना सादर केला. हा अहवाल आता पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंदवार यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवला जाणार आहे. या ३०० कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणी सरकारने यापूर्वीच हा करार रद्द केला आहे.

या वादग्रस्त जमीन खरेदी-विक्री व्यवहारात पार्थ पवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र,  समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव कोणत्याही कागदपत्रात आलेले नाही, त्यामुळे त्यांना दोषी ठरवले गेले नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "संपूर्ण सेल डीलमध्ये पार्थ पवार यांचे नाव कुठेही नसल्याने, त्यांना चौकशीत दोषी ठरवता येणार नाही."

तपास समितीने थेट या व्यवहारात सहभागी असलेल्या रवींद्र तारू, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी या तिघांना  जबाबदार धरले आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आले  की, या व्यवहारात कंपनीला २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीमध्ये चुकीच्या पद्धतीने सूट देण्यात आली. तपास समितीने भविष्यात अशा फसव्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत.

"पार्थ पवार यांचा त्यांच्या कंपनीत भागीदारी ९९ टक्के आहे. ज्यांची एवढी मोठी भागीदारी आहे त्यांचे नाव यात येत नाही. महाराष्ट्रात सरकारने सगळ्यांना अशाच प्रकारे न्याय दावा. याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारांना लावला तो इतरांनाही द्यावा लागेल," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar's name missing in land scam, raises questions.

Web Summary : Report on Pune land scam omits Parth Pawar despite 99% stake. Ambadas Danve questions the exclusion, demanding equal justice. Probe finds irregularities in stamp duty waivers.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारAmbadas Danweyअंबादास दानवेAjit Pawarअजित पवार