औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसणारा मराठवाडा थंडीने गारठला असून, सात जिल्ह्यांतील किमान तापमान दहा अंशांच्या खाली आले आहे. परभणीत तर गुरूवारी थंडीची लाटच आली होती़ येथे किमान तापमान ३.६ अंश नोंदविले गेले. नागरिकांना पहाटे आणि सायंकाळी ७ नंतर घराबाहेर पडणे देखील कठीण गेले. यापूर्वी १७ जानेवारी २००३ रोजी सर्वात कमी २़८ अंश एवढे किमान तापमान नोंदले गेले होते. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}