शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या डॉक्टरला हायकोर्टाचा दिलासा

By admin | Updated: October 10, 2014 05:43 IST

या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने डॉ. सिंग यांना पुन्हा व्यवसाय करण्याची मुभा मिळाली आहे.

मुंबई : पनवेल शहरात एसटी स्टॅण्डच्या अगदी समोर असलेले ‘पॅनेशिया’ रुग्णालय चालविणारे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ डॉ. सुभाष सिंग यांचा डॉक्टरी व्यवसाय परवाना निलंबित करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने डॉ. सिंग यांना पुन्हा व्यवसाय करण्याची मुभा मिळाली आहे.पनवेलच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी डॉ. सिंग यांना गेल्या डिसेंबरमध्ये गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायद्यान्वये (पीसीपीएनडीटी कायदा) दोषी ठरवले होते. त्यांना एक महिन्याची कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने डॉ. सिंग यांचा डॉक्टरी व्यवसायाचा परवाना ११ जुलैपाूसन तहकूब केला होता.डॉ. सिंग यांनी केलेली रिट याचिका मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मेडिकल कौन्सिलच्या निर्णयास स्थगिती दिली. वस्तुत: डॉ. सिंग यांना दोषी ठरविणाऱ्या दंडाधिकाऱ्यांच्या निकालास अलिबाग येथील सत्र न्यायालयाने ११ जूनलाच स्थगिती दिली होती. परिणामी डॉ. सिंग यांच्यावर दोषित्वाचा ठपका राहिलेला नव्हता. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून व ते दोषी ठरले आहेत असे मानून मेडिकल कौन्सिलने घेतलेला हा निर्णय तद्दन चुकीेचा आहे, असे नमूद करत खंडपीठाने त्यास स्थगिती दिली.खंडपीठाने असे स्पष्ट कले की, डॉ. सिंग यांच्या दोषित्वाला स्थगिती देणारा सत्र न्यायालयाचा आदेश लागू आहे तोपर्यंत त्यांची डॉक्टरीची ‘सनद’ तहकूब करण्याचा मेडिकल कौन्सिलचा निर्णयही स्थगित राहील. सत्र न्यायालयाने कोणत्याही कारणाने स्थगिती आदेश उठविला किंवा डॉ. सिंग यांचे अपील फेटाळले गेले तर मेडिकल कौन्सिलचा निर्णय लगेच लागू होईल. तसेच डॉ. सिंग याचे अपील सत्र न्यायालयाने मंजूरकेले तर मेडिकल कौनिसलचा निर्णय आपोआपच कायमचा रद्द होईल. (विशेष प्रतिनिधी)